आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीचा वाद:अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप पदाधिकारी रवींद्र सळगावकर यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रवींद्र साळगावकर हे भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय पोलिस घेणार आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा या तक्रारीत सांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही बळजबरीने मोजणी केली जात होती. या प्लॉटचा ताबा सध्या साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे.

धमकीचे फोन

या तक्रारीत साळगावकर यांनी सांगितले आहे की, याबाबत हवेली तहसीलदार यांच्याकडेही यापूर्वी अर्ज दाखल केला आहे. तसेच चतुर्शिंगी पोलीस ठाण्यातही अर्ज दिला आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव असल्याने शासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. याबाबत पोलिसांच्या नियंत्रण कक्षास मी मला धमकीचे फोन येत असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, तरीही मला अद्याप उत्तर दिले गेलेले नाही.

अदखलपात्र गुन्हा

या फाईलला अजित पवार यांचे नाव असल्याने, यामध्ये माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही फाईल कोणत्याही विकास कामाची नसून मोकळ्या प्लॉटच्या संदर्भात आहे. त्यामुळे मला असे वाटते की, माझ्या जीवाला अजित पवार यांच्याकडून धोका आहे.याबाबत पोलिसांकडे तक्रार करून ही, त्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकत असे सांगितले. त्यामुळे याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा अशी माझी मागणी आहे.