आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची प्रतिक्रिया:मामा राजेंद्र घाडगेंच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई, अजित पवार म्हणाले - 'ईडीला चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार'

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगेंच्या ताब्यात होता. आता या कारवाईविषयी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, जरंडेश्ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. ईडीला चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली आहे. त्या चौकशीमधून काहीही निष्पन झालेले नाही. सर्व बाजूंनी पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

या कारखान्याच्या व्यवहाराविषयी अजित पवारांनी भाष्य केले. 'मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने 2007 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टने त्या साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत देण्यास सांगितले होते. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढण्याच्या सूचनाही मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या 14 साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा देखील समावेश होता.'

सर्वात जास्त टेंडर गुरु कमोडिटीनेभरले होते पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, हा कारखाना विकत घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यांनी टेंडर भरले होते. मात्र यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ कंपनीकडून भरण्यात आले होते. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले. अशी माहिती अजित पवारांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...