आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनात यंदा 4 दिवस ग्रंथप्रदर्शन:वर्धा येथे होणाऱ्या संमेलनातील ग्रंथप्रदर्शनासाठी आजपासून नावनोंदणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरण मराठी वाचकांच्या परिचयाचे आहे. संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध प्रकाशने आणि त्यांनी प्रकाशित केलेली लक्षावधी पुस्तके, खरेदी करण्याची मोठी संधी ग्रामीण भागातील वाचकांना उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर संमेलनातील ग्रंथप्रदर्शनासंदर्भातील महत्त्वाची माहिती पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने कळवली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ आणि ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी वर्धा येथे होत आहे. या संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांना ग्रंथ प्रदर्शनात गाळा / गाळे आणि प्रतिनिधीसाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सकाळी ९. ३० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत उपलब्ध आहेत. संमेलनास उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींसाठीचे शुल्क ४०००/- रूपये आहे. त्यात निवास, भोजन तसेच वर्ध्यातील निवासव्यवस्थेपासून ते संमेलनस्थळापर्यंतची वाहतूक व्यवस्था अंतर्भूत आहे.

गाळे आरक्षणासाठी नोंदणी शुल्क रु. ७०००/- आहे. प्रत्येक गाळेधारकास १०x१० आकाराचा गाळा देण्यात येईल तसेच मागील बाजूस ५x१० ची अधिकची जागा प्रत्येक गाळेधारकास देण्यात येईल. दि. २ ते ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत असे चार दिवस ग्रंथ प्रदर्शन साहित्य रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. गाळे आणि प्रतिनिधींसाठी नोंदणी शुल्क १९ डिसेंबर २०२२ पासून ते दि. २० जानेवारी, २०२३ या कालावधीत रोख किंवा डी. डी. स्वरूपात जमा करता येईल.

ग्रंथ प्रदर्शन नोंदणी अर्ज विदर्भ साहित्य संघाच्या vssnagpur.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्रंथप्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी विदर्भ संघाच्या abmss96wardha@gmail.com या मेलवर संपर्क करता येईल. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार (९८२३०६८२९२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...