आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उष्णतेची लाट:अकोला देशात दुसरे सर्वाधिक उष्ण शहर, 47.4 अंश सेल्सियस तापमान, उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांमुळे पारा चढता

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील बहुतेक शहरांत उष्णतेची तीव्र लाट कायम

 विदर्भात उष्णतेची लाट आली असून किमान तापमानाचा पारा पंचेचाळिशी पार गेला आहे. अकोला येथे आज सर्वाधिक ४७.४ अंश एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. देशात सर्वाधिक ४७.५ अंश तापमान राजस्थानातील चुरू शहरात नोंदवण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावर अकोला आहे. विदर्भात सर्व जिल्ह्यांतील कमाल तापमान सलग तिसऱ्या दिवशी चाळिशीपार गेले आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अद्याप दोन दिवस टिकून राहील, अशा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा चढता

निरभ्र आकाश, कोरडे हवामान व उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या परिणामामुळे विदर्भ - मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे आयएमडीने म्हटले आहे. मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांतील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. औरंगाबादेत सोमवारी ४३.१ अंश तापमानाची नोंद झाली.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान

: अकोला ४७.४, नागपूर ४७, चंद्रपूर ४६.८, गोंदिया ४५.८, वर्धा ४६, अमरावती ४६, जळगाव ४५.३, सोलापूर ४५, परभणी ४६, औरंगाबाद ४३.१, सातारा ४०.४, पुणे ४०.१

बातम्या आणखी आहेत...