आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पुणे-सातारा महामार्गावर मद्य तस्करी करणारा ट्रक जप्त, 35 हजार लिटर मद्यसाठा हस्तगत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक दोन यांनी हवेली तालुक्यातील भांडेवाडी गावचे हद्दीत, हॉटेल विशालच्या मागे मद्याची तस्करी करणारा एक ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी टँकरसह 35 हजार लीटर मद्य व इतर सामान असा एकूण 40 लाख 31 हजार 974 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी परप्रांतीय टॅकर चालक व क्लीनरला अटक करण्यात आली आहे. टँकर ड्रायव्हर मोहमद रफिक नायब रसुल सय्यद (वय 46) व टँकर क्लिनर राजूराव श्रीजीराव राव (वय 37, दोघेही रा. बडोदा, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक तानाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जुन रोजी हवेली तालुक्यातील भांडेवाडी गावचे हद्दीत, पुणे-सातारा महामार्गाच्या उजव्या बाजूस असलेल्या हॉटेल विशालच्या मागे मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक दोन यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पहाटे निरीक्षक तानाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे, एन. जे. पडवळ, एस. बी. मांडेकर, के. एस. पावडे, बी. आर. सावंत, ए. आर. सिसोलेकर व महिला कर्मचारी मनिषा भोसले यांनी या ठिकाणी अचानकपणे छापा घातला.

अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार

यावेळी मद्याची तस्करी करीत असताना टँकर ड्रायव्हर मोहमद रफिक नायब रसुल सय्यद व टँकर क्लिनर राजूराव श्रीजीराव राव या दोघांना रंगेहाथ पकडले. परंतू एक आरोपी हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याठिकाणी तपासणी केली असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा चौदाचाकी टँकरसह 35 हजार लीटर मद्य व इतर असा एकूण 40 लाख 31 हजार 974 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरून टँकर ड्रायव्हर सय्यद व क्लिनर राव यांना अटक करून गुरवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांस न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...