आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपक्षीय खासदार बारामतीत:भाजप, बसपा आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांसह काही उद्योगपती बारामतीच्या दौऱ्यावर, पवार कुटुंबीयांकडून पाहूणचार सुरू

बारामती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील विविध राज्यांतील खासदार आणि काही उद्योगपती बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यात भाजप, सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा समावेश असल्याने सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. खासदारांचा बारामती दौरा वैयक्‍तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भाजपचे 5 खासदारही उपस्थित आहेत. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या खासदारांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

बारामतीतील विविध विकास कामे,बारामतीच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याची खासदार पाहणी करणार आहेत. तर बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योग अशा विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. आज सायंकाळपर्यंत हा पाहणी दौरा सुरु राहणार आहे. या दौऱ्यात सर्व खासदारांनी फेरेरो आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. यानंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्‍सटाईल पार्कला भेट देत महिलांशी संवादही साधला आहे. यानंतर सर्वांनी विद्या प्रतिष्ठानला भेट दिली. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी बड्या उद्योगपतींसह खासदारांना विकासकामांची माहिती दिली आहे.

नेमके कोणते खासदार बारामतीत?
यामध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे. तर युवजन श्रमिकचे लवू कृष्णा देवरियालू, बसपाचे रितेश पांडे, यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे विवेक गुप्ता, सौगता रॉय आणि इतर चार खासदार आणि काही उद्योगपती बारामतीच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. आणि याच दौऱ्याची महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...