आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानाट्य:अमोल कोल्हेंचा पिंपरी-चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले- फ्री पास द्या नाहीतर नाटक कसे होते बघतो, अशी धमकी दिली

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत तिकीट द्या नाहीतर नाटक कसे होते ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेक्षकांसमोर येत याबाबत सांगितले. तसेच या अनुभवाचा व्हिडीओ ट्वीट करत माहिती दिली. अमोल कोल्हे म्हणाले, आत्तापर्यंत नाशिक, मुंबई, पुणे येथील पोलिसांनी चांगले सहकार्य केले. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिस याला अपवाद ठरल्याचे त्यांनी सांगितले.

खेदाची बाब शेअर करण्यासाठी आलो

अमोल कोल्हे म्हणाले, प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलिस बांधवांनी प्रचंड सहकार्य केले. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांनी तर 2 हजार 500 पोलिस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचे तिकिट काढून दाखवले. मात्र, आज मी खेदाची बाब शेअर करण्यासाठी आलो आहे.

पालकाचे मी आभार मानतो

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकिट मागण्याची आहे. अगदी शेवटी 300 रुपयांचे तिकिट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो.

खाकी वर्दीचा प्रचंड अभिमान

अमोल कोल्हे म्हणाले, इथे मी केवळ फक्त आणि फक्त शिवशंभू म्हणून सादरीकरण करतो, ना कुठला प्रोटोकॉल असतो, ना कुठली सिक्युरिटी असते, इतकंच कशाला तर तुमच्या खाकी वर्दीचा मला प्रचंड अभिमान आहे, मला प्रचंड आदर आहे म्हणून मी पर्सनल पोलीस सिक्युरिटी गार्डसुद्धा घेत नाही.