आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Amruta Fadanvis Critizsize Cm Uddhav Thackeray After Rajya Sabha Election | Now Devendra Is Not Alone, The Whole Universe Is With Him; The Present King Is Not Good For The People

अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका:माझे पती एकटे नाहीत, सारे जग त्यांच्यासोबत; पण सध्याचा राजा प्रजेसाठी ठीक नाही

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केले आहे. "अब देवेंद्र अकेला नही है, सारी कायनात उनके साथ है. सध्या आपला जो राजा आहे, तो प्रजेसाठी ठिक नाही" असे म्हणत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्या आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूने सर्वजण भाजपच्या पाठिशी उभे आहेत याचा मला आनंद आहे. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र अकेला नही है, ना कभी था उनके साथ पुरी कायनात है... प्रगतीचे राजकारणच पुढे येईल. एकमेकांवर खोटक टीका करणाऱ्याचे राजकारण कधीच पुढे येणार नाही.

भाजप कर्तृत्वाचे डाव खेळते

अमृता फडणवीस म्हणाल्या की, शिवसेनासाठी हा धडा नसून, त्यांच्यासाठी येथून पुढे धडे सुरू होणार आहेत. भाजपला स्वत:च्या कर्तृत्वार विश्वास आहे. त्यावरूनच विजय मिळत आहे. राज्यात रडीचा डाव खेळण्यासाठी भाजप नसून महाविकास आघाडी आहे. भाजप कर्तृत्वाचे डाव खेळते.

विधान परिषद आपलीच

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले होते की, कधीकधी अमिताभ बच्चनचे चित्रपट प्लॉप जावू शकतात. मात्र, बच्चन हा बच्चन असतो असे म्हटले होते. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, विधान परिषदेचा निकाल देखील समोर दिसत आहे. राज्यसभा भाजपची झाली आहे तर विधान परिषदेसाठी काहीच दुमत नाही.

बातम्या आणखी आहेत...