आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:अभिनेत्याने रसिकांशी नेहमीच एकनिष्ठ राहावे : प्रशांत दामले

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ प्रतिमा आणि सुसंस्कारांच्या आधारे अभिनेत्याने राजकारण न करता नेहमी रसिकांशी एकनिष्ठ राहावे. वैयक्तिक जीवनात कोणती विचारसरणी असावी याचे देखील त्याला स्वातंत्र्य असावे, अशी भूमिका अभिनेते प्रशांत दामले यांनी रविवारी मांडली. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, दामले म्हणाले की, माझे गेली ४० वर्षापेक्षा अधिक काळ रसिकांशी नाते आहे. नव्या-जुन्याचा संगम करत व्यावसायिकता जपत रसिकांची निखळ करमणूक केली पाहिजे, त्यासाठीच मी अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक लढवली. नाट्य परिषदेने अखिल भारतीय स्तरावर काम करायला हवे, असेही ते म्हणाले.