आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा:बारामती दौऱ्यात भयाचे वातावरण दिसले ; जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांचे वक्तव्य

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती लोकसभा मतदारसंघात मी दोन दिवस दौरा केला आहे. यादरम्यान मला बारामतीमध्ये भयाचे वातावरण दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारांबद्दल आम्हाला आदरच आहे, मात्र त्यांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली हे दाखवून द्यावे. जनतेसमोर खरी परिस्थिती आली पाहिजे, असे मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे, आमदार भीमराव तापकीर, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, धर्मेंद्र खंडारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...