आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील घटना:शाळेत जात असलेल्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जात असलेल्या मुलीला चहा प्यायला नेण्याचा बहाणा करत पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने आरोपीच्या हाताला झटका देऊन पळ काढला. तर ही घटना शाळेच्या सुरक्षा रक्षकाने पाहिल्यावर त्याने मुलीला वर्गात पोहवून वर्ग शिक्षकांना याची कल्पना दिली.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सुजित रॉय नावाच्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

काय आहे प्रकरण?

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले, पीडित 11 वर्षाची मुलगी महापालिकेच्या कर्वेनगर येथील अशोक विद्यालयात शिक्षण घेतले. तर आरोपी शाळेसमोरच असलेल्या मस्त एन फस्त चहा सेंटरमध्ये काम करतो. तीची शाळा साडेसातला असते, मात्र तीची बस तिला पावणे सात वाजता शाळेत सोडून जाते. शाळा सुरू होईपर्यंत ती सुरक्षा रक्षकाजवळ बसून रहाते. सुरक्षा रक्षक तीला स्टूलवर बसवून चहा पिण्यास गेल्यावर आरोपीने तीचा हात पकडून चहा प्यायला चल असे म्हणत घेऊन जाऊ लागला. यानंतर मुलीने आरडा ओरडा करत हात झटकून पळ काढला. तोवर चहा पिऊन परतत असलेल्या शाळेच्या सुरक्षा रक्षकाने आणि रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाने ही घटना बघितली.

गुन्हा दाखल

दुचाकी चालकाने सुजति रॉयला फटवल्यानंतर त्याने पळ काढला. दरम्यान सुरक्षा रक्षकाने मुलीला वर्गात सोडून वर्ग शिक्षकांना याची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी वर्ग शिक्षकांनी पीडितेच्या आईला बोलावून घटनेची माहिती दिली. यानंतर पॉस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्याशी बोल, नाही तर दुसरी मुलगी शोध

घराच्या परिसरात सायकल शिकत असताना एका अल्पवयीन मुलीची तरुण आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने छेड काढली. यानंतर तीचा मोबाईल नंबर जबरदस्तीने घेण्यात आला. फोन करुन घरात कोणी नसल्याची खात्री होताच दोन्ही आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसले. यानंतर घराचा दरवाजा लावून "तुला आमच्याशी बोलायचे नसेल तर आम्हाला दुसरी मुलगी पाहून दे ' अशी धमकी दिली.

याप्रकरणी सोहेल सय्यद (22, रा.गुरुवार पेठ,पुणे) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर खडक पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल हा अभियांत्रीकीचे शिक्षण घेतो. तो आणि त्याचा अल्पवयीन साथीदार घराच्याखाली स्कुटरवर बसून टाईमपास करत होते. यावेळी त्यांच्या परिसरात रहाणारी 16 वर्षीय पीडित मुलगी सायकल शिकण्यासाठी आली होती. ती सायकल शिकत असताना दोघेही वेगवेगळे आवाज काढनू तिची छेड काढत होते.

जबरदस्ती घेतला नंबर

यानंतर त्यांनी जबरदस्ती तीचा मोबाईल नंबर घेतला. नंबर घेतल्यापासून ते सातत्याने तीला कॉल तसेच व्हॉटसअप करत होते. दरम्यान 29 ऑक्‍टोबर रोजी दोघेही ती घरात एकटी असल्याचे समजताच तीच्या घरात घुसले. घराचा दरवाजा आतून बंद करत "तुला आमच्याशी बोलायचे नसेत तर आम्हाला दुसरी मुलगी पाहून दे' अशी धमकी दिली. पिडीत मुलगी घाबरली असल्याने तीने काही दिवस पालकांना याची माहिती दिली नव्हती. पालकांना माहिती मिळताच तक्रार दाखल करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...