आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:शाळकरी मुलीला चहा प्यायच्या बहाण्याने पळवून नेण्याचा प्रयत्न

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जात असलेल्या मुलीला चहा प्यायला नेण्याचा बहाणा करत पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने आरोपीच्या हाताला झटका देऊन पळ काढला. ही घटना शाळेच्या सुरक्षा रक्षकाने पाहिल्यावर त्याने मुलीला वर्गात पोहाेचवून वर्ग शिक्षकांना याची कल्पना दिली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सुजित रॉय नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले, पीडिता ११ वर्षांची असून महापालिकेच्या कर्वेनगर येथील अशोक विद्यालयात शिक्षण घेते. आरोपी शाळेसमोरच असलेल्या मस्त एन फस्त चहा सेंटरमध्ये काम करतो. तिची शाळा सकाळी साडेसातला असते, मात्र स्कूल बस पावणेसात वाजता तिला शाळेत सोडून जाते. शाळा सुरू होईपर्यंत ती सुरक्षा रक्षकाजवळ बसून राहते. सुरक्षा रक्षक तिला स्टूलवर बसवून चहा पिण्यास गेला असता आरोपीने तिचा हात पकडून चहा प्यायला चल, असे म्हणत ओढून नेऊ लागला.

हा प्रकार चहा पिऊन परतत आलेल्या शाळेच्या सुरक्षा रक्षकाने आणि रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाने बघितला. दुचाकी चालकाने सुजित रॉयला हटकल्यानंतर त्याने पळ काढला. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने मुलीला वर्गात सोडून वर्गशिक्षकांना याची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी याबाबत तक्रार करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...