आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरी इंटरनॅशनलच्या ११७ वर्षांच्या कारकिर्दीतील पहिल्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे संघटनेत विविध दृष्टीकोन असणाऱ्या सदस्यांसाठी संवादाचे माध्यम खुले झाले आहे. उच्च पदावर महिलांच्या निवडीबाबत असलेला रुढीवाद मोडीत काढत, तरुण पिढीसाठी एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे मत रोटरी इंटरनॅशनलच्या पहिल्या महिला अध्यक्षा जेनिफर जोन्स यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी व्यक्त केले. ‘रोटरी इंटरनॅशनल’च्या ११७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कॅनडा येथील ओंटारियोमधील रोटरी क्लब ऑफ विंडसर रोझलँडच्या सदस्या असलेल्या जोन्स यांना हा बहुमान मिळाला आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या जोन्स यांनी शुक्रवारी पुण्यात भारतातील रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांची भेट घेतली. या वेळी रोटरी इंटरनॅशनलचे संचालक ए. एस. व्यंकटेश, डॉ. महेश कोटबागी, रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार, संगीता लालवाणी उपस्थित होते.
कर्करोगावरील रेडिओ थेरपी मशीनचे लोकार्पण
आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना कर्करोगावरील रेडिओ थेरपी उपचार घेता यावे यासाठी रोटरी डीस्ट्रीकट ३१३१ तर्फे शानिवारवाडा येथील सूर्यदत्त रूग्णालयात ‘लिनिअर एक्सलेटर रेडिओथेरपी मशीन’ उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रोटरीतर्फे ८ कोटी रुपये, तर रुग्णालयाने ४ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. उपचारासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च येतो. मात्र, सूर्यदत्त हॉस्पिटल येथे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी हा उपचार विनामूल्य असेल. शुक्रवारी जेनिफर जोन्स यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.