आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीत खुनाचा प्रयत्न:नाचण्याच्या वादातून कोयत्याने केला एकावर वार; गंजपेठेतील घटना

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीच्या विसर्जुन मिरवणुकीत नाचत असताना झालेल्या धक्काबुक्कीत एकाने कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गंजपेठेतील लोहीयानगर येथे घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अंकुश विठ्ठल कांबळे (रा. इनामके मळा, लोहीयानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत स्वप्नील सतीश साळुंखे (25, रा. लोहीयानगर, गंजपेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याचया सुमारास लोहीयानगर आणि न्यु टिंबर मार्केट परिसरात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील साळुंखे हा श्री छत्रपती शिवाजी मंडळाच्या मिरवणुकीत नाचत असताना त्याच्याच ओळखीचा असलेला संशयीत आरोपी अंकुश कांबळे यांच्यात यावेळी धक्का-बुक्की झाली. याचाच राग मनात धरून अंकुशने स्वप्नील संपुनच टाकतो अशी धमकी देत त्यांच्या मानेवर आणि पायावर धारदार कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला याप्रकरणी तात्काळ अटक केली आहे.

धक्का लागल्याने दगडफेक

विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी जात असताना एकाला धक्का लागल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून सिमेंटचे ब्लॉक, चाकूने मारहाण करून दगडफेक करत जखमी केल्याचा प्रकार केला. याप्रकरणी आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

सराईत शुभम अशोक गायकवाड (25, रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रोड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार प्रेम उर्फ ढेकण्या वाघमारे, अनिकेत पवार, नयन लोंढे, अमित साबळे, मयुर लोंढे, अदत्य वाघमारे, रोन वाघमारे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाजीराव विजय मोरे (27, रा. गणेशखिंडे रोड, इंदिरा वसाहत,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाजीराव मोरे यांनी त्यांचा मित्र आदित्य कोकाटे, मोहसीन खान, विवेक दिपक अवारे, श्रीनिवासहन पिल्ले असे वस्तीमधील गणपीतीची मिरवणुक पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी पिल्ले याचा धक्का लागल्याच्या कारणावरून संशयीत आरोपींच्या टोळक्याने परिसरात जोरजोरात आरडा ओरडा करून दहशत पसरवली. त्यानंतर त्यांनी दगडफेक देखील केली म्हणून त्यांच्यावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...