आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • An Incident Took Place At Sweetmart Shop In Galibar, Sinhagad Road Area Of Pune Due To Non distribution Of Cashew Nuts For Free.

धक्कादायक:काजू कतली फुकट न दिल्याने स्वीटमार्ट दुकानात गाेळीबार, पुण्यातील सिंहगड राेड परिसरातील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील सिंहगड राेड परिसरात स्वाीट मार्टच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेलेल्या दाेन तरुणांना काजू कतली मिठाई दुकानदाराने फुकट न दिल्याने त्यांनी थेट दुकानात गाेळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन आराेपींचा शाेध घेऊन त्यांना अटक केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.

सूरज ब्रह्मदेव मुंढे ( २३,रा. माणिकबाग, पुणे) यास अटक करण्यात आली असून त्याचा १७ वर्षाचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सिंहगड राेड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली आहे. सदरची घटना १९ डिसेंबर राेजी दुपारी चार वाजता सिंहगड राेडवरील फुलपरी स्वीट माॅल याठिकाणी घडलेली असून त्याबाबत दुकान मालक जाेधाराम धिसाजी चाैधरी (वय-५०, रा.दत्तवाडी,पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...