आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ:दुचाकी चोरी करणाऱ्या सराईताला अटक, पोलिसांनी 21 दुचाकी केल्या जप्त

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चोरणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 6 लाख 17 हजारांच्या 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने सोलापूर परिसरात दुचाकींची विक्री केली होती. पथकाने त्याच्याकडून सर्व चोरलेली वाहने जप्त केली आहेत. सुरेश संभाजी वाघमारे,( वय 28 रा. सोलापुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहनचोेरी विरोधी पथक दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. हडपसर परिसरातील वाहनचोरीचा समांतर तपास करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि दत्तात्रय खरपुडे यांना दुचाकी चोराची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सुरेश वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हडपसर, लोणीकाळभोर, लोणीकंद परिसरातून तब्बल 21 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगांवकर,पोलिस निरीक्षक सुनिल पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव यांनी केली

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील 65 हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना 21 नोव्हेंबरला संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास खारावडे-पिंरगुट बसप्रवासात घडली. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.फिर्यादी महिला 21 नोव्हेंबरला शास्त्री रोड परिसरातून पीएमपीएल बसमध्ये शिरल्या. त्यांना पिंरगुटला जायचे होते. काही वेळात बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 65 हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून खाली उतरल्यानंतर महिलेला सोन्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिस अमलदार मयुर भोसले तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...