आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीला पॉर्न स्टार बनवण्याचे दाखवले स्वप्न:अल्पवयीन मित्राकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मित्राने आपल्या मैत्रिणीला पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत तिचा अश्लील व्हिडिओ तयार करत मैत्रिणीला न सांगता, तो पॉर्नसाईटवर अपलोड केला. मुलीच्या एका मैत्रिणीने तिचा व्हिडिओ दाखवल्यावर पीडितेला ही घटना समजली. हा प्रकार वारजे परिसरात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे हे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अल्पवयीन आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आणि आरोपी दोघेही हे अल्पवयीन आहेत. त्यांची ओळख ही सोशल नेटवर्किंग साईटवरुन झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. दरम्यान, मुलाने मुलीला आंतरराष्ट्रीय स्तरारवरील पॉर्नस्टार बनवतो असे सांगत तिचा अश्लील व्हिडीओ तयार करायला लावला. मुलावर विश्वास ठेवत तिने तसा व्हिडिओ तयार करत तो मुलाला पाठवला. मात्र, त्याने तिला न सांगता तो व्हिडिओ हा पॉर्नसाईट वर उपलोड केला.

दरम्यान काही दिवस गेले. पीडित मुलगी ही तिच्या मैत्रीनीला भेटायला गेली. तेव्हा तिने तिचे काही व्हिडिओ हे पॉर्नसाईटवर अपलोड झाले असल्याचे सांगितले. तिने तो व्हिडीओ अपलोड झाल्याचे पाहिलावर तिला धक्का बसला. मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने घरच्यांना याची माहिती दिली. अखेर त्यांनी वारजे पोलिस ठाण्यात जात याप्रकरणी तक्रार दिली. चौकशीत आरोपी मुलगा हा देखील अल्पवयीन असल्याचे पुढे आले. त्यामुळे पॉस्को अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वारजे पोलीस याबाबत पुढील तपास करत आहे.

एक लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये उकळणाऱ्या आरोपींना बेड्या

अवैध सावकारांविरुद्ध पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोहीम हाती घेतली असून हडपसर येथील सावकाराला 1 लाखांचे 5 लाख रुपये उकळल्या प्रकरणी व खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबाबत फिर्यादी अरशद अब्दुल्ला शेख, (वय 40 वर्षे, पाण्याचा व्यवसाय, साळुंखेविहार रोड, वानवडी, पुणे) यांनी अवैध सावकार आरोपी रवि नरसिंग पवार,( वय 42 वर्षे, रा. हडपसर, पुणे, अशोक वसंत ठाकरे( रा. हडपसर, पुणे )यांच्या विरोधात खंडणी विरोधी पथक-2 यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व मित्र राज अन्सारी यांनी दिनांक 28/05/2019 व माहे डिसेंबर 2019 या महिन्यामध्ये आरोपी रवि पवार यांचेकडून 1 लाख रुपये मासिक 15 टक्के व्याज दराने घेतले होते. त्या 1 लाख रुपयेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी रवि पवार यास 3 लाख 30 हजार रुपये रोख स्वरुपात आणि 1 लाख 56 हजार रुपये रुपये ऑनलाईन स्वरुपात असे एकुण 4 लाख 86 हजार रुपये दिले असताना देखील रवि पवार व अशोक ठाकरे यांनी आणखीन 40 हजार रुपयेची अवाजवी मागणी फिर्यादी यांचेकडे केली. फिर्यादी यांनी रवि पवार व अशोक ठाकरे यांना पैसे देण्यास नकार दिला असता रवी पवार व त्याचा साथीदार अशोक ठाकरे असे दोघांनी फिर्यादी यांच्या मुलाला उचलून घेऊन जाऊन त्याचे हातपाय तोडून टाकतो व फिर्यादीस जीवे ठार मारुन टाकतो अशी घरात येवुन व रस्त्यामध्ये अडवून धमकी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...