आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी महागड्या वाहनांना अज्ञात आराेपीने आग लावून सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना काळेवाडी परिसरात इंद्रप्रस्थ काॅलनी येथे मंगळवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी वाकड पाेलीस ठाण्यात अज्ञात इसमा विराेधात पाेलिसांनी भादवि कलम 435 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
याप्रकरणी वाकड पाेलीस ठाण्यात ओम प्रकाश जाधुराम यादव (वय-38,रा.काळेवाडी,पुणे) यांनी अनाेळखी आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. 2 जुलै राेजी संध्याकाळी ओमप्रकाश यादव यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये दुकानाच्या शटरसमाेर पत्र्याचे शेडमध्ये पार्क केलेल्या स्विफ्ट डिझायर (कार क्रमांक एमएच 14 एचक्यु 0994), व शेजारी राहणाऱ्या भाडेकरु यांच्या हाेंडा कंपनीची पॅशन (एमएच 14 ए.एन 9465), बजाज कंपनीची प्लॅटिना (एमएच 14 एचएफ 7726) व हाेंडा कंपनीची युनिकाॅर्न (एमएच 03 एजे 1056) या सर्व गाडयांना अज्ञात इसमाने स्फाेटक पदार्थाच्या सहाय्याने आग लावली.
पाहणी आणि पंचनामा
यात सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच स्विफ्ट डिझायर कारमध्ये कारचे आर.सी.बुक व इतर कागदपत्रे जळाली आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जळलेल्या वाहनाची पाहणी केली आणि पंचनामा केला आहे. वाकड पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनरीक्षक अतुल जाधव करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.