आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधून अटक:आफताब हुसेनच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या माहितीचे विश्लेषण सुरू

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) काश्मीरमधून अटक केलेल्या आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह याला विशेष न्यायालयाने गुरुवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, आफताब याच्या समाजमाध्यमातील खात्याच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे ‘एटीएस’ने न्यायालयात सांगितले. देशात घातपाती कारवाया घडवण्यासाठी ‘लष्कर-ए-तैयबा’च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एटीएसने दापोडी येथून जुनैद महंमद अता महमंद (वय २८, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा) याला गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये शोध मोहीम राबवत २ जून रोजी जुनैदचा साथीदार आफताब शाहला (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) जेरबंद केले. त्यानंतर इनामूल हक उर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पाटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) आणि महंमद युसूफ महंमद शाबान अत्तू (वय ३१, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. दोडा, जम्मू-काश्मीर) या दोन संशयितांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...