आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हे बापटांचा गड हाेता:दवे म्हणाले - आमच्यामुळेच भाजपचा पराभव, जनतेचा काैल मान्य - चंद्रकांत पाटील

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा विधानसभा मतदारसंघात टिळक कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे निषेधार्थ ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले हाेते. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दवे यांनी सांगितले की, कसबा विधानसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपचा पराभव झाला याची खंत आम्हाला आहे; परंतु त्याचा पश्चाताप आम्हाला नाही.

खुल्या प्रवर्गाचा मतदार जास्तच कडवट होता

दवे म्हणाले, कसबा पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ या भाजपच्या हक्काचे प्रभागात मतदारांनी यावेळेस भाजपच्या विराेधात मतदान केलेले आहे. मागील निवडणुकीत आमदार मुक्ता टिळक यांना 20 हजारांचे मताधिक्य या प्रभागातून मिळालेले हाेते यंदा भाजप येथून 1400 मतांनी मागे पडला. यावेळेस खुल्या प्रवर्गाचा मतदार जास्तच कडवट हाेता आणि त्यांनी रासने यांचा पराभव करण्यासाठी सरळ काँग्रेस उमेदवारास मते दिली.

कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हता

आनंद दवे म्हणाले, भ्रष्ट, जातीय हिंदु द्वेष्टा राष्ट्रवादी पक्ष जर पहाटेच्या शपथविधीसाठी भाजपला चालत असेल तर आम्हाला का नाही? असा विचार करुन मतदारांनी काँग्रेसला पुन्हा एकदा स्वीकारल्याचे निवडणुकीत दिसून आले आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला नाहीतर बापटांचा गड हाेता हे यानिमित्ताने स्पष्ट झालेले आहे.

जनतेचा काैल स्विकारताे - चंद्रकांत पाटील

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कसबा विधानसभा पाेटनिवडणुकीतील जनतेचा काैल आम्ही नम्रपणे स्वीकारताे. लाेकशाहीत जनमताचा निर्णय सर्वाच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहे. या निवडणुकीत सर्वस्व झाेकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करताे. ‘नव्याने उभे राहु, पुन्हा कमळ फुलवू’ यानुसार आगामी काळात आम्ही वाटचाल करु.

साम, दाम, दंडभेद चालत नसतो - अंकुश काकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी कसबा मदारसंघातील विजयानंतर सांगितले की, साम, दाम, दंडभेद या नितीने भाजप निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करत हाेता; परंतु तशाप्रकारे निवडणुक जिंकता येत नाही. हे मतदारांनी दाखवून दिले आहे. एक प्रतिष्ठेची निवडणुक म्हणून या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष्य लागलेले हाेते.

काकडे पुढे म्हणाले, तब्बल 28 वर्षांनी या मतदारसंघात भाजपला पराभवास सामाेरे जावे लागले आहे. ही निवडणुक केवळ कसबा पुरती मर्यादित नसून या निवडणुकीत येणारा निकाल हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लाेकसभा निवडणुकीत दिशा देणारा ठरणार आहे. या एका जागेमुळे राज्यसरकार जाणार नव्हते; परंतु भाजप व शिंदे गटाने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे या मतदारसंघात ज्या गाेष्टी आतापर्यंत घडल्या नाहीत. त्या साम,दाम, दंडभेद नितीचा वापर करुन घडविल्या गेल्या आहे. मात्र, मतदारसंघातील मतदार भूलथापांना, अमिषाला, धाकदपटशाहीला बळी पडला नाही हे निकालातून स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...