आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने कसब्याचा राग ब्राह्मण समाजावर काढला?:आनंद दवेंचा आरोप; म्हणाले - कसब्याप्रमाणे 40 मतदारसंघात दखल घेतली जाईल

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने कसब्याचा राग ब्राह्मण समाजावर काढला का? असा सवाल अर्थसंकल्पातील तरतुदींवरून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. आर्थिक विकास महामंडळ एकच असायला हवे होते, वेगवेगळ्या जातीत भांडण लावण्याचे काम करायला नको होते असे 'दिव्य मराठी'शी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान दवे पुढे बोलताना म्हणाले की, 50 कोटी हे इन्फ्रास्टचरलाच खर्च होतात. अमृत योजना सर्व जातींमधील ओपण समाजासाठी आहे, ब्राह्मण समाजाला वेगळे असे काही दिले नाही असे म्हणतानाच पुण्यातील कसब्याने जशी दखल घेतली तशी राज्यातील 40 मतदारसंघात दखल घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.

दिवंगत मुक्ता टिळक यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीत टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा इतर ब्राह्मण समाजातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली, असा ब्राह्मण समाजाचा आग्रह होता. तशी बॅनरबाजी देखील पुण्यात करण्यात आली होती, कसब्यात भाजपला ब्राह्मण समाजाची नाराजी भोवल्याचे म्हटले जात आहे, यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

आनंद दवे यांचा आरोप

पुण्यात 'दिव्य मराठी'शी बोलताना आनंद दवे म्हणाले की, राज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक समाजाला काही ना काही दिले. मात्र 50 कोटीं ही असेच खर्च होतात लोकांपर्यंत काही जाणार नाहीत असे सांगतानाच, ब्राह्मण समाजासाठी मात्र परशुराम विकास महामंडळ दिले नाही. याचे स्पष्टीकरण देताना अमृत योजना दिली, असे सांगण्यात आले. मात्र, अमृत योजना पण ती सर्वच खुल्या प्रवर्गसाठी आहे, त्यात सगळेच दावा सांगणार असे म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे.

बजेटमध्ये काय आहे तरतूद

धनगर समाजाला 35,000 कोटी, भिडे स्मारकाला 50 कोटी, लिंगायत समाजासाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ 50 कोटी, गुरव समाजासाठी काशीबा गुरव विकास महामंडळ 50 कोटी, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ 50 कोटी, वडार समाजासाठी मारुती चव्हाण महामंडळ 50 कोटी रुपये सरकारतर्फे देण्यरत येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...