आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ओळखीच्याच व्यक्तीचे कृत्य:मित्राकडे खंडणी मागू नकोस म्हटल्याचा संताप; तरुणावर केले कोयत्याने वार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मित्राकडे खंडणी मागू नकोस असे म्हटल्याच्या रागातून सराईत टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करून जखमी केले आणि त्यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना 7 जूनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खडकमाळ आळी परिसरात घडली.

याप्रकरणी कुणाल सुरेश जाधव (वय 27 रा. खडकमाळ,पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनाथ शेलार, गणेश कोळी, विपुल इंगवले, प्रवीण माने यांच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव कांबळे यांनी तक्रार दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीतील असून खडक परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी आरोपींनी गौरवचा मित्र लखन रेवचंदाणी आणि मृणाल कांबळे यांच्याकडे खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली होती.

पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यामुळे गौरवने त्यांना मित्राकडे पैेसे मागू नका असे म्हटले. त्याच रागातून टोळक्याने गौरववर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याशिवाय मृणालवरही वार केले. संशयित आरोपींनी रेवणचंदानी याच्याकडील दुचाकी चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...