आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Anger Drama In Congress, BJP In Pune, Rohit Tilak Of Congress, Bagwe And Shailesh Tilak Of BJP Were Absent While Filling The Applications Of Candidates.

पोटनिवडणूक:पुण्यात काँग्रेस, भाजपमध्ये नाराजीनाट्य, उमेदवारांचे अर्ज भरताना काँग्रेसचे रोहित टिळक, बागवे, तर भाजपचे शैलेश टिळक गैरहजर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी निवडणूक अर्ज भरायच्या निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्याने माजी खासदार संजय काकडे नाराज झाल्याने ते साेमवारी अर्ज भरण्यास उपस्थित राहिले नाही. तसेच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक गैरहजर राहिले. काँग्रेसमध्येही असाच प्रकार काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे नेते रोहित टिळक, काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे, त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेना नेते संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे गैरहजर राहिल्याने सदर दोन्ही पक्षातील नाराजीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

संभाजी ब्रिगेडही मैदानात : कसबा पाेटनिवडणूक लढवण्यासाठी भाजप, काँग्रेस व हिंदू महासंघासाेबतच संभाजी ब्रिगेडही मैदानात उतरला आहे. संभाजी ब्रिगेडने अविनाश माेहिते यांना उमेदवारी जाहीर केली असून माेहिते यांनी साेमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव साैरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश संघटक संताेष शिंदे, सहसंघटक मनाेज गायकवाड उपस्थित हाेते.

कसब्यात हिंदू महासंघाचे आनंद दवे असतील उमेदवार दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पाेटनिवडणूक जाहीर झाली. परंतु प्रमुख पक्षांनी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंबांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे आम्ही पोटनिवडणूक लढणार असल्याचे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी जाहीर केले आहे. ही निवडणूक ताकदीने लढून जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मंगळवारी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे दवे यांनी सांगितले.

या उमेदवारांनी भरले अर्ज कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने यांनी तर पर्यायी अर्ज भाजपचे गणेश बीडकaर यांनी दाखल केला आहे. आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, संभाजी ब्रिगेड तर्फे अविनाश मोहिते यांनी अर्ज दाखल केला. मंगळवारी हिंदू महासंघतर्फे आनंद दवे, काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब दाभेकर अपक्ष अर्ज दाखल करतील.

रासनेंकडे ९.८ धंगेकरांकडे ५ कोटी संपत्ती कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी भाजपचे उमेदवार हेमंत नारायण रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी उमेदवारी दाखल केली. यासोबतच दोन्ही उमेदवारांची कोट्यवधींची जंगम आणि स्थावर मालमत्ताही सार्वजनिक झाली आहे. एकूणच यामध्ये दोन्ही उमेदवारांच्या एकूच संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

हेमंत नारायण रासने (भाजप) २०२१-२२ मध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचे वार्षिक उत्पन्न ५.७५ लाख रुपये होते. पत्नी मृणालीचे वार्षिक उत्पन्न ४.३० लाख आणि मुलगी तेजस्विनीचे उत्पन्न शून्य होते. आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जात दिली आहे. रासने यांच्याकडे १.३५ लाख रुपये आणि पत्नीकडे २२ हजार रुपये रोख आहेत. यासोबतच त्यांच्याकडे १.८२ कोटी रुपयांची आणि पत्नीकडे २७.५९ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रासने यांच्याकडे १० तोळे (किंमत ४.५२ लाख) आणि त्यांच्या पत्नीकडे १८ तोळे (किंमत ८.१३ लाख) सोने आहे. यासोबतच पत्नीकडे २५० ग्रॅम चांदी (किंमत १७५०० रुपये) आहे. भाजपचे उमेदवार रासने यांच्याकडे ७.९८ कोटी आणि त्यांच्या पत्नीकडे २५३ कोटींची स्थावर मालमत्ता पण आहे. कोट्यवधी रुपयांचा मालक रासने यांच्यावर ३.५५ कोटी आणि त्यांच्या पत्नीवर २४.९३ लाख रुपयांचे कर्ज आहे.

रवींद्र हेमराज धंगेकर (काँग्रेस) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी २०२२-२३ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न रु.३.३६ लाख आणि पत्नीचे वार्षिक उत्पन्न रु.३.९८ लाख असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. यासह एकूण ९ प्रकरणांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्यांच्याकडे १.८० लाख रुपये आणि पत्नीकडे ३.५० लाख रुपये रोख आहेत. यासोबतच त्यांच्या नावावर ४७.०६ लाख रुपयांची आणि पत्नीच्या नावावर ६८.६७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे १० तोळे सोने (किंमत ५.९० लाख) आणि त्यांच्या पत्नीकडे १५ तोळे सोने (७.५० लाख रुपये) आहे. कोट्यवधींच्या जंगम मालमत्तेसोबतच काँग्रेसच्या उमेदवाराकडे ४.५९ कोटींची स्थावर मालमत्ताही आहे. पत्नीच्या नावावर पण २.६० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकरांवर ३५.४३ लाख आणि त्यांच्या पत्नीवर ३२.०८ लाख कर्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...