आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Angered By Being Caught In The Act Of Punching The Wallet, The Young Man Was Stabbed With A Sharp Weapon; One Arrested By Pune Police

पाकीट मारताना पकडल्याने राग अनावर:तरुणावर धारदार शस्त्राने वार करत लुबाडले; पुणे पोलिसांकडून एकास अटक

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील शिवाजीनगर भागात मनपा जवळ गाडगीळ पुलावर गप्पा मारत उभा असलेल्या दाेन तरुणांचे पॅन्टच्या मागील खिशात ठेवलेले पाकिट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलासह दाेघांना रंगेहाथ संबंधित तरुणांनी पकडले. मात्र, एका तरुणावर आराेपींनी धारदार शस्त्राने वार करुन त्यास जखमी करत पाकिट पळवून नेल्याचा प्रकार घडला. पाेलिसांनी याप्रकरणी आराेपीस अटक केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.

अक्षय गणेश शिंदे (वय-23,रा.डेक्कन,पुणे) या आराेपीस पाेलिसांनी अटक केले असून त्याचा अल्पवयीन साथीदार याचा पोलिस शाेध घेतात.याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राम प्रमेसिंग खटका (वय-23,रा.चतुश्रृंगी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना 17 नाेव्हेंबर राेजी रात्री साडेअकरा वाजता घडल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. तक्रारदार राम खटका व त्यांचा मित्र अनमल थापा हे दाेघे पुलाजवळ गप्पा मारत उभे हाेते.

त्यावेळी एक लहान मुलगा व त्याचा साथीदार त्यांच्या बाजुला गप्पा मारण्यास येऊन अचानक त्यांनी तक्रारदार यांचे पॅन्टच्या मागील खिशात ठेवलेले पाकिट काढण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तक्रारदार यांनी आराेपींचा हात पकडला असता त्याचे साेबत असलेल्या इसमाने तक्रारदार यांचे उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जखमी केले. तर दुसऱ्या आराेपीने तक्रारदार यांच्या पॅन्टच्या मागील उजव्या खिशातील पाकिटासह त्यात असलेले तक्रारदार यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक ऑफ बडाेदा बँकेचे एटीएम कार्ड, तसेच तक्रारदार यांचे आईवडीलांचा असलेला पासपाेर्ट अकाराचा फाेटाे व पगाराचे पैसे असा 18 हजार रुपये जबरदस्तीने जखमी करुन चाेरुन नेले. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस अहिवळे करत आहे.

चाेरटयाने जबरदस्तीने माेबाईल हिसकावला
मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय अब्दुल कादीर सलामत हे काेंढवा परिसरात साई सर्व्हिसेसचे गेट जवळ सार्वजनिक रस्त्यावरुन ते काम करत असलेल्या त्यांचे मालकचे दुकानात पायी जाताना,त्यांचे फाेनवर फाेन आल्याने ताे उचलत असताना पाठीमागून माेटारसायकलवर आलेल्या अज्ञात आराेपीने त्यांचे हातातील 18 हजार रुपये किंमतीचा माेबाईल हिसका मारुन नेला आहे. याबाबत काेंढवा पोलिसपुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...