आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल होवाळे यांचे निधन:पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, डीक्कीचे होते माजी पुणे विभाग अध्यक्ष

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डीक्की ) चे माजी पुणे विभाग अध्यक्ष अनिल होवाळे यांचे शनिवारी सकाळी पूना हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले ते 61 वर्षाचे होते . त्यांना नुकतेच हदयाच्या आजाराचे निदान झाले होते. गेल्या एक महिन्यापासून ते पुना हॉस्पिटल येथे मृत्यूशी झुंज देत होते .अखेर आज त्यांची झुंज अपयशी ठरली व त्यांची प्राणज्योत मावळली .

होवाळे हे पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते. पुणे व महाराष्ट्रातील दलित तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करण्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर वैंकुठ स्मशाभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डीक्कीचे संस्थापक पद्मश्री डॅा मिलिंद कांबळे यांनी होवाळे त्यांच्या निधनाने दलीत चळवळ आणि डीक्कीचे न भरून येणारे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया दिल्ली येथून दुरध्वनीवर दिली .

यावेळी डीक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष मुकुंद कमलाकर ,महीला आघाडी राष्ट्रीय समन्वयक सीमा कांबळे ,एवरेस्ट पाईप उद्योग समुहाचे अविनाश जगताप , पुणे अध्यक्ष राजू साळवे ,पश्चिम भारत समन्वयक संतोष कांबळे , अमित अवचरे , महाराष्ट्रातील बहुसंख्य उद्योग व्यवसायीक , सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...