आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट:आधी अण्णा बनसोडेंच्या मुलाने केली बेदम मारहाण, जीव वाचवण्यासाठी आरोपीने झाडली गोळी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीने सांगितले- गोळी झाडली नसती, तर त्यांनी माझा जीव घेतला असता
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

बुधवारी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या घटनेची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे, ज्यात बनसोडे यांचा मुलगा समर्थकांसोबत आरोपीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणीदरम्यान आरोपी हवेत गोळीबार करतो. यापूर्वी, अण्णा बनसोडे म्हणाले होते की, आरोपीने आधी त्यांच्यावर गोळीबार केली, नंतर समर्थकांनी त्याला चोप दिला.

पोलिसांच्या तपासात समोर आले की, गोळीबार करणारा आरोपी आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्यात नगर पालिकेचा कचरा उचलण्याच्या कंत्राटावरुन वाद झाला होता. आरोप आहे की, आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थने आपल्या साथीदारांसोबत मिळून तानाजी पवारचे अपहरण केले आणि आपल्या कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान पवारने आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली.

असा झाला घटनेचा खुलासा
या गोळीबारानंतर घटनास्थळावर आलेल्या पोलिसांना जमिनीवर रक्त सांडेलेले आणि तानाजी पवार गंभीर जखमी झालेले दिसले. बनसोडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, तानाजी पवार याने आधी बनसोडे यांच्या कार्यालयात गोळीबार केला. पण, पोलिसांना गोळीबाराचे कुठलेही पुरावे आढळले नाही. यानंतर CCTV फुटेजमधून घडलेला प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी पवारच्या जबाबानंतर बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थसह 8 जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

गोळी झाडली नसती, तर त्यांनी माझा जीव घेतला असता
तानाजी पवारने आपल्या तक्रारीत म्हटले की, '12 मे रोजी सकाळी 11 वाजता जीवे मारण्याच्या हेतूने माझे अपहरण करुन काळभोर नगरमधील एका कार्यालयात आणले. इथे सिद्धार्थ आणि त्याच्या साथीदारांनी मला लाथा, बुक्क्या, बेल्ट आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. मी गोळी चालवली नसती, तर सिद्धार्थने मला जीवे मारले असते.'

पोलिसांकडून अद्याप कुणालाही क्लीन चिट नाही
या प्रकरणात दोन्ही पक्षाने परस्परविरोधी हत्येचा प्रयत्न करण्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, कुणालाही क्लीन चिट देण्यात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...