आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांची प्रकृती बिघडली:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस; आजची रात्र रुग्णालयातच जाणार

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील रूबी हॉल रूग्णालयात अण्णांना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अण्णा हजारे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. डॉ. परवेझ ग्रांट यांनी ही अँजिओग्राफी केली.

अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता नाही असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच आम्ही अण्णा हजारेंवर उपाय करत आहोत, त्यांची काळजी घेत आहोत चिंतेचे कोणतेही कारण नाही असेही डॉ. परवेझ यांनी सांगितले. अण्णा हजारे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

दरम्यान, अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरु आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा, अशी भावना व्यक्त केली.

'अण्णांची प्रकृती ठणठणीत', राळेगणसिद्धीच्या कार्यालयातून प्रसिद्धपत्रक जारी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने ही अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आहे आहे. अण्णा काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे.

गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. काल डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सूचना केली. त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे.

झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला तरी वयानूरूप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरीत तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी आजिबात काळजी करण्याचे कारण नाही, असं अण्णांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बातम्या आणखी आहेत...