आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे उघड आहे, अशी खोचक टीका काँग्रेस नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. नोटबंदीपासून देशात भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असून या घसरणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. मोदी सरकार हे केवळ घोषणांच्या बळावर जगलेले भारताच्या इतिहासातील एकमेव सरकार असल्याचेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पाबाबत भाष्य करताना ते म्हणाले, अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ठोस तरतुदी असण्याची शक्यता फारशी नाही. सलग तीन वर्षे आर्थिक वृद्धीचा दर उणे असणारा भारत हा एकमेव देश असून, देशाची क्रयशक्ती वाढवण्यासाठी सरकारने काहीही केले नसून मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गंभीर नसल्याचेही डॉ. मुणगेकर म्हणाले.
सरकारने बाऊ न करता कृषी कायदे मागे घ्यावेत
केंद्र सरकारने कोणताही बाऊ न करता नवे कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहनही डॉ. मुणगेकर यांनी केंद्र सरकारला केले आहे. सरकारच्या प्रतिष्ठेपेक्षा जनतेची प्रतिष्ठा महत्वाची आहे. एमएसपी काढण्यानंतर कायदेशीर हमी न दिल्यास देशातील कृषी क्षेत्र उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.