आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अकरावी प्रवेश प्रक्रिया:अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26 जुलैपासून होणार सुरू  

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी उशीरा जाहीर करण्यात आले. यानुसार अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या 26 जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. असे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारुप Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आणि पालकांना अचूकपणे अर्ज भरण्यास मदत होऊ शकेल.

या अर्जात भरलेली माहिती 24 जुलैनंतर नष्ट करण्यात येणार आहे. केवळ सरावासाठी 16 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत  Mock.Demo.Registration या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.