आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्वानासोबत घरातच तब्बल दोन वर्ष जन्मदात्यांनी 11 वर्षीय मुलाला कोंडून ठेवल्याचा खळबळजनक आणि तेवढाच धक्कादायक प्रकार पुणे शहरात उघडकीस आला. दोन वर्ष बंदीस्त अवस्थेत जीवन व्यतीत करणाऱ्या या मुलाची मानसिक स्थिती बिघडल्याची माहितीही समोर आली आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या मुलाची सुटका करण्यात आली असून या प्रकरणात आई-वडीलांवर कोंडवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पुणे जिल्हा चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक अपर्णा मोडक यांनी तक्रार दिली. त्यानुसार, पुण्यातील एका सोसायटीत एका कुटुंबात 11 वर्षांचा पोटचा मुलाला आई वडिलांनी गेल्या दोन वर्षापासून घरात डांबून ठेवले. यामुळे या मुलाच्या मनावर परिणाम होऊन तोही श्वानासारखा वागत असल्याचेही तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मुलाला आई वडिलांनी बाहेर घरातून काढले नाही. मात्र या मुलाची माहिती सामाजिक संस्थेला मिळाल्यानंतर चाईल्ड लाईन समन्वयकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार दिल्यानंतर चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते पुन्हा मुलाच्या घरी गेले, तेव्हाही मुलाला घरात डांबून ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांना फोन करुन बोलावून घेण्यात आले. चाईल्ड लाईन समन्वयकांनी त्या घराची पाहणी केली असता घरात अस्वच्छता होती आणि मुलगा श्वानाजवळ बसलेल्या स्थितीत होता. त्याची वर्तणूक श्वानांसारखीच वाटल्याने बाल कल्याण समिती पुणे आणि पोलिसांना या बाबत माहिती देण्यात आली आहे.
आई - वडिलांवर गुन्हे दाखल
मुलाला नेमके घरात का कोंडून ठेवले असावे? हा प्रश्न पोलिस अधिकाऱ्यांना विचारला असता ते म्हणाले, त्याचे आई वडील विक्षीप्तपणाने वागत आहेत आणि मुलालाही विक्षिप्त वागणूक देत आहेत. हे पालक रस्त्यावरचे श्वान उचलून घरात आणायचे असे त्यांनी 22 श्वान घरात आणुन ठेवल्याचेही तक्रारीत नमुद आहे.
आरोग्य धोक्यात येईल असा होता परिसर
ज्या ठिकाणी मुलगा आणि श्वान होते तेथे कोणतीही स्वच्छता नव्हती. पोटच्या मुलालाही हीन वागणूक आणि श्वांनाकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन वर्षापासून श्वानासोबत राहून मुलाची मनस्थिती बिघडली आणि त्याच्या मनावर परिणाम झाल्याचेही तक्रारीत नमुद आहे. या प्रकरणात संबंधित मुलाच्या आई -वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलालाही बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.