आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:पुण्यात आणखी एका एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आज शनिवारी पुण्यातील सदाशिव पेठेत आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे. पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासून तो नैराशात असल्याचे समजते.

एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची दुसरी वेळ
दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सांगलीच्या अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो अभ्यासासाठी पुण्यात आला होता. तो पुण्यातील सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहत होता. मोहिते पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता.

बातम्या आणखी आहेत...