आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Anti Defection Law And Values Of Democracy Principal Dr. Sudhakarrao Jadwar Trophy, Organization Of State Level Intercollegiate Competition

पक्षांतर विरोधी कायदा आणि लोकशाहीची मूल्ये:प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक, राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा शक्तीला योग्य गती व दिशा देण्यासोबतच त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता पुण्यामध्ये प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने चौथ्या प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 ते 28 ऑगस्ट दरम्यान मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे.

वक्तृत्व, भारुड, भजन, पोवाडा, वादविवाद, पथनाटय या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली. स्पर्धेचे उद्धाटन 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे. उद्धाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार असून पक्षांतर विरोधी कायदा आणि लोकशाहीची मूल्ये, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, गांधी मार्कस आणि आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था, माझी धर्म चिकित्सा असे विषय आहेत.

वक्तृत्व स्पर्धा

तर, भारुड/भजन/पोवाडा स्पर्धा देखील याच दिवशी होणार आहे. कोणत्याही महाविद्यालयाच्या 12 वी च्या पुढच्या विद्यार्थ्याला स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता आयोजित करण्यात आली आहे.

इथे लोकशाही आहे?

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, वादविवाद व पथनाटय स्पर्धा रविवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून सुरु होणार आहेत. वादविवाद स्पर्धेकरीता इथे लोकशाही आहे? हा विषय असणार आहे. तसेच पथनाटय स्पर्धेकरीता समाजातील ज्वलंत समस्या या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे.

8 सप्टेंबरला पारितोषिक वितरण

सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला 11 हजार 111 रुपये, द्वितीय क्रमांकाला 7 हजार 777 रुपये, तृतीय क्रमांकाला 5 हजार 555 रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावणाऱ्यांना चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभागी होणार असून नोंदणी सुरु आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 8 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे.

येथे संपर्क साधा

स्पर्धेत सहभागाकरीता 9922074847, 7972483575, 9604864015, 9145074673, 9405227753 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...