आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:'शुक्रतारा' कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांचा ‘अरुण दाते कला सन्मान’ने गौरव, सांगितली अरुण दातेंची आठवण

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • - अरूण दाते वडिलांप्रमाणे कायमच माझ्या पाठीशी उभे राहिले; अनुराधा पौडवाल यांनी दिला आठवणींना उजाळा

अतुल अरुण दाते व अभय गाडगीळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शुक्रतारा’ या सांगीतिक कार्यक्रमात आज सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा यावर्षीच्या अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

रामुभैय्या दाते स्मृती प्रतिष्ठान व पी एन गाडगीळ यांच्या वतीने ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ, मंजु अतुल दाते आदी उपस्थित होते.

अरुण दातेंची आठवण

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, अरुण दाते कायम वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण आज त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. अरुण दाते त्यांच्या आवाजाच्या रूपात, संगीताच्या रुपात आजही आपल्या सर्वांमध्ये आहेत. त्यांचा मुलगा अतुल दाते आपल्या वडिलांच्या आठवणी तितक्याच ग्रेसफुली सर्वांसमोर आणतोय ही मोठी गोष्ट आहे. अतुल दाते यांनी आपल्या वडिलांचे संगीत खऱ्या अर्थाने जिवंत ठेवले आहे.

खंबीर साथ

माझ्या सास-यांना माझ्या गाण्याचे खूप कौतुक होते आणि मी आशाताईंसोबत गावे ही तीव्र इच्छा देखील. इतरांच गाणं लग्नानंतर बंद होतं माझं सुरू झालं. अरुण दातेंनी मला नेहमीच खंबीर साथ दिली. माझे सासरे गेले आणि त्यानंतर पंडित हदयनाथ मंगेशकर यांचा आशाताईं सोबत गाणं गाण्यासाठी मला फोन आला. पण ज्या दिवशी रेकॉर्डिंग होणार होतं त्या दिवशी माझ्या सासर्यांचा तेरावा होता म्हणून मी नाही म्हणाले. त्यावेळी माझ्या सासुबाईंनी ही तुझ्या सास-यांची इच्छा होती आणि तू ती पूर्ण कर असे म्हणत मला गायला तयार केलं, अशी आठवण पौडवाल यांनी सांगितली.