आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर गुरुवारी पुणे दोऱ्यावर होते. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी ठाकूर यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर आणि बॅनर घेऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अनुराग ठाकूर यांची विधाने जातीयवादी आणि समाजात फूट पाडणारी असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. याशिवाय संस्थेत दरवर्षी होणाऱ्या फी वाढीलाही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला. या आंदोलनाला विद्यार्थी संघटनेनेही पाठिंबा दिला होता.
मंत्रालयाकडून निधी कमी करण्याची धमकी -
अनुराग ठाकूर यांच्या राजकीय विचारसरणीला आणि त्यांच्या भूतकाळातील कृतींना विरोध दर्शवत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना आय अँड बी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून थेट धमकी मिळाली होती की, जर आम्ही अनुराग ठाकूर यांना विरोध केला तर मंत्रालय संस्थेसाठी देण्यात येणार निधी कमी करेल आणि विद्यार्थी कल्याण योजना बंद करेल. हे आमच्या लोकशाही अधिकारांसाठी घातक आहे, असे विद्यार्थ्यांच्या संघटनेने सांगितले.
ठाकूर विद्यार्थ्यांशी नीट बोलत नसल्याचा आरोप -
अनुराग ठाकूर यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी मूक निदर्शने केली. यावेळी 2 मिनिटांसाठी अनौपचारिक अनुराग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी आपले मुद्दे कागदावर लिहून अनुरागसमोर ठेवला. मात्र, त्यांनी यावर भाष्य केले नाही. उलट विदर्थ्यांना अनुराग ठाकूर यांच्या रागाचा सामना करावा लागला.
ठाकूर यांच्या विचारसरणीचा परिणाम संस्थेवर -
अनुराग ठाकूर यांची गेल्या वर्षी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत आमची संस्था चालते. आमच्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर त्यांच्या विचारसरणीचा थेट परिणाम होते. आमची शैक्षणिक परिषद रद्द करण्यात आली आहे आणि आमच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही, असे विद्यार्थी संघटनेने म्हटले.
संस्था दरवर्षी 5% फी वाढवत आहे -
सरकारकडून मिळणारे अनुदान आणि अलीकडेच सुरू झालेल्या अनेक शॉर्ट टर्म कोर्सेसमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न असूनही, प्रशासन सध्या येणाऱ्या बॅचच्या फीमध्ये दरवर्षी 5% वाढ करते आहे. यापूर्वीही अनेक मुद्दे उपस्थित केले होते. पण, काहीच कारवाई झाली नसल्याचे असोसिएशनने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.