आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२२-२३ आंबिया बहारमध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या ९ फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी मंगळवारी केले आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून ३० जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...