आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे क्षेत्रीय संचालक म्हणून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार तसेच स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सदस्य सचिन ईटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1957 मध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दिवंगत डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. हे मंडळ विविध व्यवसाय आणि उद्योगांसह महाराष्ट्र शासनाला ठोस आर्थिक निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे कार्य करते.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ ही महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी विशेष लक्ष्यवेधी कार्य करणारी एकमेव संस्था आहे. साधनसामग्रीचा विकास, संतुलित क्षेत्रीय विकास, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राची भागिदारी, पर्यटन आणि कृषी आणि जल संसाधन, आर्थिक उन्नती आणि मनुष्यबळ विकास या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ सचोटीने कार्यरत आहे.
लालचंद हिराचंद, शंतनूराव किर्लोस्कर, बी.डी. गरवारे, बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी पालखीवाला यांच्यासारख्या उद्योग आणि अर्थशास्त्र क्षेत्रातील दिग्गजांनी अध्यक्षपद भूषविलेल्या महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळामध्ये सचिन ईटकर त्यांचे योगदान देणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.