आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचा गंडा:कर्ज मंजुरीच्या बहाण्याने आर्किटेक्टची 21 लाखांची केली फसवणूक, पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिक कामानिमित्त पैशांची आवश्यकता असल्याने मित्रामार्फत ओळख झालेल्या एका व्यक्तीने माेठ्या रकमेचे कर्ज बँकेतून मंजूर करून देताे, असे सांगत 21 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पाेलिस ठाण्यात आराेपी मिलिंद दिंगबर गाेसावी (वय 42, रा. आंबेगाव, पुणे, मु. रा. अंमळनेर, जि. अहमदनगर) यांच्यावर पाेलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आर्क्टिकेट दीपक दत्तात्र्य चव्हाण (वय 59, रा. आकुर्डा, पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. संबंधित प्रकार 5/10/2016 ते 15/10/2016 यादरम्यान घडला आहे. संबंधित आराेपी मिलिंद गाेसावी हा विविध कामांसाठी कर्ज मिळवून देताे, असे सांगून काम करत आहे. आर्क्टिकेट दीपक चव्हाण यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्याने तुम्हाला माेठे कर्ज मंजूर करुन देताे, असे आश्वासन दिले.

याकामाकरिता विविध कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण 21 लाख रुपये स्वीकारण्यात आले. मात्र, त्यानंतर अद्याप काेणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करुन न देता तसेच त्यांची घेतलेली रक्कम परत न करता वेळ वाया घालवत उडवाउडवीची उत्तरे देवून आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत पिंपरी पाेलिस पुढील तपास करत आहेत.

आठ लाखांची फसवणूक

दुसऱ्या घटनेत रियल इस्टेट मध्ये जास्त फायदा आहे. तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एका व्यावसायिकाची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अशाेक गाेरख खरात (रा. गहुंजे, पुणे) या आराेपी विराेधात निगडी पाेलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काैशल प्रकाश पांचाल (33, रा. निगडी, पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दिली आहे. सदर प्रकार 1/1/2020 ते 6/8/2020 यादरम्यान घडला आहे. आराेपीने पांचाल यांना रियल इस्टेटमध्ये आठ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 40 हजार रुपये देईल व शेवटी राहिलेल्या नफ्यातून 50टक्के नफा देताे, असे सांगुन 8 लाख रुपये स्विकारुन काेणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...