आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पुन्हा हादरले!:गाडीचा धक्का लागल्याने वाद; तरुणाचा केला निघृण खून,पाच आरोपींना अटक

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कोंढवा परिसरात शिवनेरीनगर येथील भगवा चौकात तीन ऑगस्ट रोजी गाडीचा धक्का लागल्याने पुर्ववैमनस्यातून एका तरुणाचा निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना गुरुवारी रात्री अटक केली. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (05 ऑगस्ट) दिली. महेश लक्ष्मण गुजर (वय 26) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वादातून केली खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांनी अमर कैलास गव्हाणे (वय 34), राजकुमार लक्ष्मण पवार (वय 29) कृष्णा गणेश मराठे (वय 31) ,सचिन विष्णु राठोड (वय 22) आणि गणेश सिजाराम हाके (वय 46) यांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडे मृत महेश याचा भाऊ कुमारी सोनी लष्मण गुजर (वय 21) याने आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. आरोपी आणि तक्रारदार हे कोंढवा परिसरात एकाच भागात राहणारे आहे. एक ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महेश याच्या सोबत गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन आरोपी व महेश यांच्यात वाद झाले होते. त्या वादाचा राग मनात ठेऊन बाळा कोरडे, अमित कोरणे, अमर गव्हाणे यांनी महेश यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

खून करण्याचा रचला कट

तीन ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी अमर गव्हाणे याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी संगतमताने कट रचून पालघनने वार करुन महेश याचा निघृण खून केला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. संबंधित आरोपी पोलिस रेकॉर्डवरील नसताना त्यांनी खुनासारखा गंभीर गुन्हा केल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेत अखेर त्यांना अटक केली आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...