आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सेनाप्रमुख म्हणाले- चित्रपटांत नायिकेच्या वडिलांना नेहमीच खडूस का दाखवले जाते, हे टाळले पाहिजे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात अनेक आव्हाने, परंतु सेना आणखी मजबूत झाली : नरवणे

सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे सहज म्हणाले, ,‘मी चित्रपटांत नेहमीच भारतीय सैन्य अधिकाऱ्याचे तेच ते रूप बघितले आहे. भारतीय चित्रपटात सुंदर नायिकेच्या कर्नल वडिलांना नेहमीच खडूस दाखवले जाते. तो सिल्क गाऊन घातलेला असतो. त्याच्या हातात व्हिस्कीची बाटली आणि दुसऱ्या हातात बंदूक असते. हे खरेच मला त्रासदायक वाटते. सर्जनशील स्वातंत्र्याचा मी सन्मान करतो. पण मला वाटते की, कोणताही समाज आणि चारित्र्य क्लिष्ट पद्धतीने दाखवणे टाळले पाहिजे.’ सैन्यदल प्रमुखांनी हे मत भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन (एफटीआयआय, पुणे) च्या कार्यक्रमात मांडले. औचित्य होते एफटीआयआयच्या टेलिव्हिजन विंगच्या सुवर्णजयंती समारोहाच्या (१९७१-२०२१) उद्घाटनाचे. या वेळी नरवणे यांनी मूलभूत मूल्ये दृढ करणे, देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचे रक्षण करणे आणि संकटसमयी प्रेरणा देण्यात चित्रपटांच्या भूमिकेबाबत त्यांनी कौतुक केले. यासोबतच ते म्हणाले की, भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांना एकाच धाटणीत दाखवणे टाळले पाहिजे.

जनरल नरवणे म्हणाले, ‘देश आव्हानात्मक परिस्थितीतून चालला आहे. महामारीत पश्चिम आणि उत्तर दोन्ही सीमांवर (पाकिस्तान आणि चीन) अस्थिरता वाढली आहे. पण या आव्हानांचा का सामना करताना सेना आणखी मजबूत झाली आहे.

युद्ध दोन सैन्यांमध्ये नव्हे, दोन देशांत होत असते
जनरल नरवणे म्हणाले की, युद्ध दोन सैन्यांत नव्हे तर दोन देशांत लढले जाते. त्यांची ही टिप्पणी अशा वेळी आली जेव्हा भारतीय सेनेने म्हटले की, पूर्व लडाखमध्ये गोगरा केंद्रावरून भारत-चीनच्या सैन्याने आपापल्या सैनिकांना मागे हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याशिवाय जमिनीवरील परिस्थितीही पूर्ववत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...