आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट नोटांचे रॅकेट:पुण्यात बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश, 43 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 6 जणांना अटक

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमाननगर भागातील एका बंगल्यावर छापा टाकून पुणे शहर पोलिसांनी बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश केला. चलनातून बाद झालेल्या ५००, १०० तसेच नव्या दोन हजारांच्या सुमारे ४३.४ कोटी रुपये आणि ४.२ कोटींच्या अमेरिकी डॉलर्सच्या बनावट नोटा एका बंगल्यातून जप्त केल्या. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एक लष्कराशी संबंधित बँड पथकात कार्यरत असलेला ड्रमर असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बनावट नोटांचा छापखाना असल्याची माहिती लष्कराच्या सदर्न कमांड गुप्तचर यंत्रणेकडून पुणे शहर पोलिस दलास दोन दिवसांपूर्वी मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ४ व अमली पदार्थविरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. या वेळी शेख अलीम गुलाब खान, सुनील बद्रीनारायण सारडा, रितेश रत्नाकर, तुफैल अहमद मोहंमद इशाक खान, अब्दुल गनी रेहमतुल्लाह खान आणि अब्दुल रहेमान अब्दुल गनी खान अशा सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...