आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकष्टी चतुर्थी विशेष:श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात संकष्टीला २ हजार किलो द्राक्षांची आरास; सकाळी ९ पासून दिवसभर दर्शनासाठी सोय

पु्णे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि. २१ मार्च) गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम २ हजार किलो द्राक्षांची आरास केली जाणार आहे. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली जाणार आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास केली जाईल. सोमवारी सकाळी ९ वाजता ही आरास पूर्ण झाली असून भाविकांना पाहण्यासाठी खुली आहे. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून येत आहे, अशी माहिती ट्रस्टचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...