आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:घरातून गांजा विक्री करणाऱ्याला अटक;

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात दोन विविध घटनांत गांजा विक्री करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. आंबेगाव बुद्रुक येथील एक जण घरातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथक एकला मिळाली होती. त्यानुसार पाेलिसांनी छापा टाकून अमित ऊर्फ बॉब प्रभाकर कुमावत (३२) याला अटक केली आहे. त्याच्या घरातून ४ लाख २३ हजार रुपये किमतीचा २० किलो ९४० ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, गांजा पिण्याचे पेपर रोल बॉक्स असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाेलिस नाईक विशाल शिंदे यांना सदाशिव दांगटनगरातील स्वस्तिक हाइट्स इमारतीतील एका घरातून गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. .

दुसऱ्या घटनेत, अमली पदार्थविरोधी पथकाने पेट्रोलिंगदरम्यान सिंहगड रोड परिसरात जाधवनगर येथे सनी विजय भाेसले (२४) व साई गीता कोताकोंडा (१९, दोघे रा. सिंहगड रोड, पुणे. मु. रा. श्रीरामपुर, नगर) या दाेन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे ३१ हजार रुपये किमतीचा १ किलो ५५४ ग्रॅम गांजा, १८ हजार रुपयांचे २ मोबाइल, ४०० रुपयांचे २ कोयते असा एकूण ५२ हजार ४८० रुपये किमतीचा माल जप्त केला. लाखांचा गांजा जप्त

बातम्या आणखी आहेत...