आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामौजमजा करण्यासाठी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणाऱ्या चोरट्याला खंडणीविरोधी पथकाने एकनेकर्वेनगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सोनसाखळी आणि मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी रविवारी दिली आहे.
प्रविण मधूकर डोंगरे (वय २३ रा. कर्वेनगर,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा कर्वेनगरमधील शाहू कॉलनीत आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रवीण डोंगरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एक ऑगस्टला गिरीजा शंकर सोसायटी परिसरातून जाणाऱ्या वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, एपीआय अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, नितीन कांबळे, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे यांनी केली आहे.
चोरट्यांनी मोबाईल पळवला
पत्नीला बोलण्यासाठी खिशातून मोबाइल बाहेर काढल्याची संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी एकाचा फोन हिसकावून नेला. ही घटना २७ जुलैला रात्री अकराच्य सुमारास हडपसरमधील हांडेवाडी चौकात घडली असून दत्ता काळदंते (वय ५१ रा. सातवनगर, हडपसर,पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता हे कुटूंबियासह सातवनगरमध्ये राहयला आहेत. २७ जुलैला रात्री अकराच्या सुमारास ते घरानजीक रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी त्यांनी पत्नीसोबत बोलण्यासाठी खिशातून मोबाइल बाहेर काढला. नेमकी तीच संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.