आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल वाहनचाेराला बेड्या:आरोपीकडून 13 वाहने जप्त; पुणे, मुंबई, सांगली, नगर, नागपूरमधून दुचाकींची चोरी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर येथून दुचाकी चाेरणाऱ्या अट्टल वाहनचाेरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. विनाेद आनंद कांबळे (वय ३०), असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सहा लाख रुपयांची एकूण १३ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे.

चंदननगर पाेलीस ठाण्यात वाहनचाेरीचा एक गुन्हा दाखल असून त्याबाबत गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक तपास करत हाेते. तपासादरम्यान, या आराेपीची गाेपनीय माहिती काढली असता ताे पुण्यातील विमाननगर परिसरात खुळेवाडी येथे येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलीस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने पुणे-अहमदनगर महामार्गाकडून खुळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून आराेपी विनाेद कांबळे यास माेटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील वाहनाबाबत तपास केला असता त्याने ही माेटारसायकल हडपसर भागातून चाेरी केल्याची कबुली दिली. पाेलिसांनी त्यास अटक करुन सखाेल तपास केला असता त्याने अशाचप्रकारे पुणे मुंबई, नागपूर, अहमदनगर, सांगली आदी शहरांमध्ये वाहनचाेरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून पाेलिसांनी सहा लाख रुपये किंमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट सहाने मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात दाेन सराईत वाहनचाेरांना अटक करुन त्यांचेकडून एकूण १५ वाहनचाेरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अशाप्रकारे मे महिन्यात एकूण २८ वाहनचाेरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...