आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्षांचे आगमन लांबणीवर:उजनीत हिवाळी पाहुणे 'फ्लेमिंगों'चे आगमन लांबणीवर, पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याने अच्छादित

कंदर4 महिन्यांपूर्वीलेखक: गणेश जगताप
  • कॉपी लिंक

थंडीची चाहूल लागताच शे-दोनशेंच्या गटाने हजारो मैलांचा टप्पा पार करून उजनी धरण परिसरात दरवर्षी आपल्या पिल्लावळांसह डेरा टाकणारे नजाकतदार रोहित पक्षी डिसेंबर संपत आला तरी आलेले नाहीत. अग्निपंख व फ्लेमिंगो या इंग्रजीतील नावाने परिचित असलेले हे हिवाळी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लांबणीवर पडल्याची माहिती जिल्ह्यातील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली.

डॉ. कुंभार यांनी नुकताच धरण परिसरातील, डिकसळ, रेल्वेच्या जुना पुलपरिसर, कोंडारचिंचोली, खानोटा, टाकळी, कात्रज आदी ठिकाणच्या पाणलोट क्षेत्रात पक्ष्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून ही माहिती दिली. यावर्षी पावसाळ्यात बरसलेल्या अतिउत्तम पावसाने उजनी जलाशय तुडूंब भरले असून स्थलांतरीत पक्ष्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा तुलनेने पक्ष्यांची गर्दी कमी दिसून येत आहे. धरण परिसरात झालेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे व पुणे परिसरातील धरणातून विसर्ग केलेल्या पाण्यामुळे यावर्षी उजनी जलाशयाच्या काठावरील पक्ष्यांचा चराऊ भाग बऱ्याच दिवसापासून पाण्याने आच्छादित झाल्यामुळे फ्लेमिंगोसह इतर स्थलांतरित पक्षी आपली वेळापत्रक बदललेचा अंदाज पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.

येत्या काही दिवसात रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर जलाशयाच्या काठावर भाग पाण्यापासून मुक्त झाल्यावर दलदल निर्माण होऊन पक्ष्यांचे प्रमुख खाद्य मुबलकपणे उपलब्ध होईल आणि रोहित सह नानाविध स्थलांतरित पक्षी आपली हजेरी लावतील असा अंदाज आहे.

दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी सामान्यपणे ऑक्टोबर महिन्यात रोहित पक्षी सोलापूर जिल्ह्यातील काही जलसस्थानावर येऊन दाखल होतात. जिल्ह्यातील हिप्परगा, आष्टी, पंढरपूरच्या पद्मावती तलाव व अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात येऊन दाखल होणारे फ्लेमिंगो (रोहित) अद्याप तिकडे पण पाठ फिरवली आहे.

यंदाच्या दमदार पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आठवडाभर पडलेल्या कडाक्याची थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती मात्र अचानक घोंगावलेल्या निवारा चक्रीवादळामुळे वातावरण अस्थिर झाले. त्यामुळे स्थलांतरित फ्लेमिंगोने धरण परिसराकडे पाठ फिरवली असावी. आता थंडी पुन्हा स्थिरावत आहे. लवकरच धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचा विसर्ग होईल व जलाशयाच्या काठावर दलदल भाग निर्माण होऊन चराऊ भाग उपलब्ध होईल. मग फ्लेमिंगोसह, विविध करकोचे व बदके हजेरी लावतील असा अंदाज आहे. डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक.

बातम्या आणखी आहेत...