आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास क्रुझवरील अमली पदार्थ प्रकरणी झालेल्या गुन्ह्यातून पोलिसांनी निर्दोष मुक्त केले आहे. याप्रकरणी हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
आर्यन खान याच्यासह सहा जणांना सबळ पुराव्या अभावी पोलिसांनी निर्दोष सोडले असून, याबाबत न्यायालयाने फेरतपासणी करून संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, याचिकाकर्ते प्रीतम देसाई आणि ॲड सुबोध पाठक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
काय म्हणाले ॲड. पाठक?
ॲड. सुबोध पाठक म्हणाले, शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यास अमली पदार्थ प्रकरणी अटक केल्यानंतर हे प्रकरण ऐरणीवर आले. आर्यन खान यास घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहाथ क्रुझवर पकडले होते. त्याचप्रमाणे आर्यन खान याने गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी पुढे मान्य केले होते. त्याच कारणास्तव सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्र बाहेर जाऊन आर्यन खानसह सहा सहकाऱ्यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत दोषारोपपत्रतून मुक्त केले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही? ते न्यायालयात केसच्या दरम्यान टिकणार की नाही ? ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र, आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले आहे. एखाद्या आरोपीला गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. मात्र, याप्रकरणात पोलिसांकडून अशा प्रकारे कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कायद्यापेक्षा आर्यन खान मोठा आहे का हा प्रश्न निर्माण होतो आहे. बॉलिवूड मधील एका मोठ्या कलाकाराचा मुलास कोणत्या दबावातून केसमधून वगळले गेले हे सत्य समाजासमोर आले पाहिजे.
36 पानांची कागदपत्रे
ज्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला अटक केली ते अधिकारी आणि दोषारोपपत्र दाखल करणारे अधिकारी वेगवेगळ्या असल्याने त्यांच्या तपासात तफावत असल्याचेही आम्हास जाणून येत आहे. या संदर्भात संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफील राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्र बाहेर जाऊन सर्व आरोपींना मदत केली यासंदर्भात आम्ही 36 पानांची कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. याबाबत उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.