आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • As BJP Does Not Accept The Constitution, One Country, One Party Concept, 'one Country, Many Parties' Is Needed To Sustain Democracy Eat. Supriya Sule

भाजपला घटना मान्य नाही म्हणून एक देश एक पक्ष संकल्पना:लोकशाही टिकविण्यासाठी एक देश, अनेक पक्षच हवेत - सुप्रिया सुळे

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपची लाेके संपूर्ण राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने फिरतात याचा मला आनंद आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले हाेते की, ‘एक देश,एक पक्ष’ म्हणजेच हे वक्तव्य घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विराेधी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही हे संविधानानुसार चालणारे लाेक आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की, ‘एक देश आणि अनेक पक्ष’ कारण संविधानानुसार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तशाप्रकारे लिहून ठेवले आहे. नड्डा हे वरिष्ठ नेते असून त्यांचे वक्तव्य दुर्देवी आहे. आम्ही आमच्या मतदारसंघात जे विराेधक येतील त्यांचे ही स्वागतच करताे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी साेमवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

22 ते 24 सप्टेंबर दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसाच्या बारामती लाेकसभा दाैऱ्यावर पक्ष बांधणीकरिता येत आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, सीतारामन यांचे मी बारामती लाेकसभा मतदारसंघात स्वागत करते. मी त्यांना दिल्लीत विनंती केली आहे की, त्या बारामती लाेकसभा मतदारसंघात दाैऱ्यास आल्यानंतर त्यांनी काेणतीही संस्था, जागा आपल्याला पाहवयाची असेल तर लाेकांची या भागातील प्रतिनिधी म्हणून लाेकांच्या वतीने त्यांना मदत करुन माहिती देईल. सिंहगड किल्ला परिसरात झालेल्या सुधारणा, पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या अंजीरास मिळालेली आेळख, बारामतीचा विकास, इंदापूर मधील पर्यटन, दाैंड परिसरातील साखर कारखाने अशाचप्रकारे भाेर, वेल्हा, मुळशीत परिस्थिती असून अनेक गाेष्टी पाहण्यासारख्या असून त्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष कामे पाहवीत. बारामती मतदार संघ देशात विकासाचे एक माॅडेल म्हणून पाहिले जाते. देशातील अनेक राज्यांचे शिष्टमंडळ बारामतीचा विकास पाहण्याकरिता येतात त्यामुळे अर्थमंत्री सितारामन यांना इतकी विकासकामे पाहण्यास तीन दिवसांचा वेळ कमी पडेल. लाेकशाही देशात टिकवायची असेल तर चर्चा ही झालीच पाहीजे.

अजित पवार नाराज नाही..

दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात विराेधी पक्षेनेते अजित पवार यांना भाषण करु न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा हाेती याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या,

काल सर्वचजण भाषणे करणार हाेते. परंतु कार्यक्रमात भाषणे लांबली गेली मी सुध्दा माझ्या सात मिनिट वेळेपेक्षा अधिक बाेलले. त्यामुळे कार्यक्रमास उशीर झाला हाेता. काही लाेकांची विमान, रेल्वेची वेळ झालेली हाेती. त्यामुळे अजित पवार, सुनील तटकरे, वंदना चव्हाण असे पाच ते सहाजण बाेलले नाही. जयंत पाटील यांनी ही थाेडक्यात भाषण आटाेपले.त्यानंतर थेट साहेबांना भाषण करु दे म्हणजे वेळेत कार्यक्रम संपेल अशी चर्चा झाली. मात्र, इतके काही बातमी हाेण्या इतपत इंटरेस्टिंग घडलेले नाही.

महामार्गावरील खड्डे बुजवा चांगली संकल्पनाराष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दाखवा तीन दिवसात आम्ही ते भरु असे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे याबाबत सुळे म्हणाल्या, गडकरी यांनी चांगल्या हेतूने ही कल्पना मांडली असून त्याबाबतची माहिती संसदेत ही दिली आहे. पुणे शहर व परिसरातील महामार्गावरील ज्या अडचणी आहे त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...