आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महत्त्वाचा निर्णय!:पुण्यात पुन्हा संचारबंदी, मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध; 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे कोरोनाच्या परिस्धितीचा आढावा घेतला. यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारपासून रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कार्यक्रमांमध्ये 200 नागरिकांचे बंधन

यासोबतच लग्न समारंभ यासोबतच राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी पहिले पोलिसांची परवनगी घ्यावी लागणार आहे. 200 नागरिकांचे बंधन घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खासगी कोचिंग क्लासेसची परवानगी रद्द

रात्री 11 वाजेनंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच शाळा आणि महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच असणार आहेत. यासोबतच खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...