आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन महाराज की जय!:तब्बल 90 लाख भाविकांनी घेतले पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचे ऑनलाइन दर्शन

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ भारतीय नव्हेच, तर जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह सोशल मीडियावर तब्बल 90 लाखांहून अधिक गणेशभक्तांनी घेतले आहे.

गणेशोत्सवानिमित्त भारतासह परदेशातून लाखो गणेशभक्तांनी ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेतला आहे.

90 लाख भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरू झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाइटवरून 3 लाख 53 हजार 781 हून अधिक भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाइटवरून दररोज सकाळी व रात्री होणारी लाइव्ह आरती व दर्शन देखी 1 लाख 61 हजार 579 गणेशभक्तांनी घेतले आहे. तर, सुमारे ६७ लाख ७७ हजार भाविक फेसबुकवरून, इन्स्टाग्रामवर 16 लाख 9 हजार यांसह यूटयूब व अ‍ॅपवरून देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल 90 लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.

परेशातल्या भक्तांना लाभ

भारतातील मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद, इंदोर, दिल्ली, भुवनेश्वर आदी शहरांमधून ऑनलाईन पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, युरोप, यु.ए.ई., ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, नेदरलँड आदी देशांतील भक्तांनी दगडूशेठ च्या श्रीं चे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.

24 तास दर्शनाचा लाभ

णेशोत्सवात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

असा आहे आकडा

  • फेसबुक - 67,77, 163
  • वेबसाईट - 05,15,360
  • इन्स्टाग्राम - 16,09,098
बातम्या आणखी आहेत...