आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:तब्बल 90 लाखांवर गणेशभक्तांनी  दगडूशेठ श्रीं चे घेतले ऑनलाइन दर्शन

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन ट्रस्टच्या वेबसाइट, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल ९० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी घेतले आहे. ट्रस्टतर्फे सुरू झालेल्या उत्सवकाळात व प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या काळात भारतासह परदेशातून लाखो गणेशभक्तांनी ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेतला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरू झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाइटवरून ३ लाख ५३ हजार ७८१ हून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. वेबसाइटवरून दररोज सकाळी व रात्री होणारी लाइव्ह आरती व दर्शनदेखील १ लाख ६१ हजार ५७९ गणेशभक्तांनी घेतले आहे. तर, सुमारे ६७ लाख ७७ हजार भाविक फेसबुक, इन्स्टाग्रामवर १६ लाख ९ हजार यांसह यूट्यूब व अ‍ॅपवरून दर्शन घेतले आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवकाळात आजपर्यंत तब्बल ९० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजिटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत. उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रींचे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाइट, अ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वार ऑनलाइन दर्शन व्यवस्था केली आहे.

देश-विदेशातील गणेशभक्तांना घरबसल्या होत आहे श्रीं चे दर्शन बाप्पा विदेशात लोकप्रिय दगडूशेठ हलवाई गणपती देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे. भारतातील मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, इंदूर, दिल्ली, भुवनेश्वर आदी शहरांमधून ऑनलाइन पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, युरोप, यू.ए.ई., ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, नेदरलँड आदी देशांतील भक्तांनी दगडूशेठच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.

९० लाखांहून अधिक भाविकांनी घेतले ऑनलाइन दर्शन ६७,७७,१६३ फेसबुक ५,१५,३६० वेबसाइट १६,०९,०९८ इन्स्टाग्राम

बातम्या आणखी आहेत...